नितीन गडकरींचा अध्यक्षपदाचा कालावधी लांबला

December 15, 2012 10:07 AM0 commentsViews: 3

15 डिसेंबर

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी येत्या 20 डिसेंबरला होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. 19 डिसेंबरला नितीन गडकरी यांची अध्यक्षपदाची मुदत संपणार आहे. पण निवडणूक लांबणीवर पडल्यानं आता त्यांना मुदतवाढ मिळालीय. काही राज्यांमध्ये भाजपच्या अंतर्गत निवडणुका होणार असल्यानं पक्षानं हा निर्णय घेतलाय. आता जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून नितीन गडकरी यांची फेरनिवड जवळपास निश्चित आहे. मध्यंतरी आरएसएसने नितीन गडकरीच दुसर्‍यांदा राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं स्पष्ट केलंय.

close