अजित पवार होणार ‘पॉवरफुल’

December 22, 2012 12:06 PM0 commentsViews: 52

22 डिसेंबर

सिंचन घोटाळ्यावरून झालेल्या आरोपामुळे व्यथित होऊन राजीनामा फेकून देणारे अजित पवार आता आणखी 'पॉवरफुल्ल' होणार आहे. अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळात कमबॅक केलं. आता अजितदादांकडे पुन्हा एकदा अर्थ, नियोजन आणि ऊर्जा खातेही देण्यात येणार आहे.

याबद्दल अजित पवारांनी आज बारामतीत होत असलेल्या नाट्यसंमेलनात जाहीर सभेत बोलत असताना अर्थ आणि ऊर्जा खातं देण्यात यावं अशी इच्छा (मागणी) बोलून दाखवली. अजितदादांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, मंत्रिमंडळातून जाण्याचा निर्णय पवारांचा होता. ते गेले याबद्दल आम्हासर्वांना धक्का बसला पण ते परत आले त्यामुळे त्यांची हात बळकट करण्यात येईल असं सांगत सोमवारी याबद्दल आदेश काढणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

मागिल आठवडात अजित पवारांनी शपथ घेतली खरी पण ते बिनखात्याचे मंत्री म्हणून अधिवेशनात हजर होते. अधिवेशनातही अजितदादा एकाकी असल्याचं दिसून आलं. 25 सप्टेंबरला अजित पवार यांनी 'या कानाची खबर त्या कानाला' न लागू देता अचानक राजीनामा दिला होता. तिन दिवसांनंतर शरद पवार यांनी पवारांचा राजीनामा स्विकारला होता. पण सत्तेविना फक्त 72 दिवसच पवार बाहेर राहू शकले. आघाडीकडून सिंचन घोटाळ्यावर श्वेतपत्रिका सादर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांना परत मंत्रिमंडळात बोलवावे अशी मागणी केली. अखेर अजित पवारांनी अधिवेशनाच्या अगोदर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आता दोन दिवसातच पवार आणि 'पॉवरफुल्ल' होतील.

close