शिवारायांचं स्मारक अरबी समुद्रातच होणार -मुख्यमंत्री

December 25, 2012 2:10 PM0 commentsViews: 10

25 डिसेंबर

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रातच होणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. पर्यावरणाच्या परवानग्यांमुळे हे स्मारक इतरत्र उभारता येईल का असा विचार सरकार करत होतं. पण आता हे स्मारक अरबी समुद्रातच होईल. टीकाकारांना काय टीका करायच्या त्या करू द्या पण इंदू मिलवरील आणि समुद्रातले स्मारक सरकारचे अभिवचन होते असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहे यावेळी ते बोलत होते.

close