पुण्यात मनसेचा ‘शिक्षणाचा आय चा घो’ तास

December 17, 2012 2:37 PM0 commentsViews: 12

17 डिसेंबर

पुण्यात विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध शाळांमध्ये एक विशेष मोहिम राबवलीय. शिक्षकांना इलेक्शन ड्युटीला जुंपण्याविरोधात मनसेनं 'शिक्षणाचा आयचा घो' ही मोहित सुरू केली. पुण्यातील विविध शाळांमधल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आलंय. पण यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होत असल्याची टीका मनसेनं केलीय. पुण्यातील शाळेतील जवळपास एक हजार शिक्षकांना निवडणुकीच्या वेगवेगळ्या कामी लावण्यात आले आहेत. शिक्षकांना इलेक्शन ड्युटीच्या कामाला लावण्यात आल्यामुळे शिक्षण हक्क कायद्याचा उल्लंघन होत असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा आय चा घो……! चे पत्रकं पडकावत मनसेनं राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.

close