वडील आणि भावाने केला तरुणीवर बलात्कार

December 30, 2012 10:10 AM0 commentsViews: 72

30 डिसेंबर

एकीकडे देशभरात महिलांवरील अत्याचाराविरोधात जनक्षोभ उसळला असताना डोंबिवलीत माणुसकीला आणि नात्यांना काळिमा फासणारी घटना उघड झालीये. 18 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी आणि नंतर सख्या भावानेच बलात्कार केल्याचं समोर आलंय. पीडित मुलीची आई दोन वर्षापुर्वी घटस्फोट घेऊन घर सोडून गेली. त्यानंतर या मुलीवर तिच्या वडिलांनी अत्याचार केले. दोन महिन्यांपुर्वी तिच्या मोठ्या भावालाही हा प्रकार समजला. त्यावेळी त्याने बहिनीला मदत करण्याऐवजी त्यानंही गैरफायदा घेतला. रक्ताच्या नात्यांनीच जीवन उद्धवस्थ केलेल्या या मुलीची घुसमट तिच्या मैत्रीणीने आपल्या आईच्या मदतीने पोलिसांसमोर आणली. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधन बाप आणि मुलाला अटक केली, कल्याण कोर्टाने या दोघा आरोपींना 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

close