रक्षकच बनला भक्षक, कॉन्स्टेबलकडून मुलीचा विनयभंग

December 15, 2012 10:17 AM0 commentsViews: 6

15 डिसेंबर

जनतेचा रक्षकच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा कांबळे याला एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. शिवाजी विद्यापीठ परिसरात पीडित मुलगी आपल्या मित्रासोबत बसली होती. यावेळी कॉन्स्टेबल कृष्णा कांबळेनं हे प्रकरण घरी सांगण्याची धमकी दिली आणि तिचं लैंगिक शोषण केलं. पीडित मुलीनं याप्रकरणी राजाराम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. याची दखल घेत अखेर कृष्णा कांबळे याला निलंबित करण्यात आली.

close