मुंबई-गोवा हायवेवर बस उलटून 3 ठार

December 27, 2012 11:20 AM0 commentsViews: 3

27 डिसेंबर

मुंबई -गोवा हायवेवर खेडजवळ बुधवारी रात्री खासगी बसला अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहे. जखमींना कळंबनी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर काही जखमींना खेडच्या खाजगी रूग्णालयात दाखल केलंय. स्मितचित्रा ट्रॅव्हल कंपनीची ही बस मुंबईहून सावंतवाडीकडे जात होती. मात्र अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन उलटली.

close