भारताचे पाकला 134 धावांचे आव्हान

December 25, 2012 3:21 PM0 commentsViews: 5

25 डिसेंबरबेंगळुर येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होत आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करत 9 गडीवर बाद 133 धावा केल्या आहेत. भारताने पाकला 134 धावांचे आव्हान दिलेय. अजिंक्य रहाणे आणि गौतम गंभीरने धडाकेबाज सुरूवात करत भारताचा स्कोअर सुस्थिती नेला. पण अजिंक्यने 42 धावा तर गौतम गंभीरने 43 धावांवर आऊट झाला. त्यांनंतर भारताचा डाव पत्याचा बंगल्यासारखा कोसळला. टॉपचे फलंजाज विराट कोहली, महेंद्रसिंग धोणी,सुरेश रैना आणि रोहित शर्मा पटापट आऊट झाले. तळातल्या फलंदाजीने शर्थीचे प्रयत्न करत भारताचा स्कोअर 133 धावांवर नेऊन ठेवला.

close