माण,खटावला दुष्काळाच्या झळा,जनावरांची उपासमार

December 30, 2012 9:13 AM0 commentsViews: 42

30 डिसेंबर

सातारा जिल्ह्यातल्या माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाच्या झळा आता तीव्र झाल्यात. पाणी आणि चार्‍याअभावी परिसरातील 80 हजार जनावरांना 91 छावणींचा आधार घ्यावा लागतोय. छावणीतदेखील जनावरांना प्रत्येकी 15 किलोच चारा मिळत आहे. त्यामुळे जनावरांची देखील उपासमार सुरू आहे. तसंच पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना चार ते पाच किलोमीटर पायपिट करावी लागतेय. सरकरने या भागात 190 टँकर पाणी पुरवठ्यासाठी दिले आहे. पण हे टँकर अपुरे असल्याचं सर्वत्र दिसतंय.

close