नववर्षात डिझेल,केरोसिन 10 रूपयांनी महागणार ?

December 27, 2012 12:52 PM0 commentsViews: 9

27 डिसेंबर

येत्या नववर्षात सरकार जनतेला महागाईचं 'गिफ्ट' देण्याची तयारी करत आहे. डिझेलचे दर दहा रुपये प्रति लिटरनं वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पण हि दरवाढ दहा महिन्यात टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला 1 रूपया अशी दरवाढ करण्याच नियोजन करण्यात आलंय. त्यामुळे जनतेवर एकदम दरवाढीचा भार देण्याच टाळण्यात आलंय. केरोसिनच्या दरातही 10 रूपयांनी वाढ करण्यात येणार आहे. केरोसिनची दरवाढ दोनवर्षांत टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिमहिना 40 पैसे दरवाढ होणार आहे. तेल कंपन्यांना होणार तोटा भरून काढण्यासाठी ही वाढ होण्याची शक्यता आहे.

close