भारताचं पाकिस्तानसमोर 228 रन्सचं टार्गेट

December 30, 2012 10:19 AM0 commentsViews: 3

30 डिसेंबर

भारत आणि पाकिस्तानदरम्यानची पहिली वन डे मॅच आज चेन्नईत रंगतेय. कॅप्टन धोणीच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 228 रन्सचं टार्गेट ठेवलंय. पाकिस्ताननं टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग दिली. पण भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 29 रन्समध्ये भारताचे निम्मी टीम गारद झाली. पण यानंतर सुरेश रैना, धोणी आणि आर अश्विननं भारताला दोनशे रन्सचा टप्पा गाठून दिला. धोणीनं 113 रन्सची नॉटआऊट खेळी केली. शिवाय अश्‍विनबरोबर सातव्या विकेटसाठी 125 रन्सची पार्टनरशिपही केली. भारतातर्फे सातव्या विकेटसाठी ही रेकॉर्डब्रेक पार्टनरशिप ठरलीय. दरम्यान, पाकिस्ताननं 20 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून 70 रन्स केले आहेत.

close