‘न्यायालयीन आयोगाकडून चौकशी करणार’

December 22, 2012 3:14 PM0 commentsViews: 8

22 डिसेंबर

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी जनतेच्या उद्रेकांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात चालवण्यात येईल. या प्रकरणासाठी न्यायलयीन चौकशी आयोगाची स्थापनाही करण्यात येईल. झालेल्या घटनेबाबत सरकार गंभीर आहे त्यामुळे येणार्‍या काळात अश्या घटना घडू नये यासाठी भारतीय दंड संविधानात सुधारणार करणार असून दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन शिंदे यांनी दिलं. त्याचबरोबर या प्रकरणातील सहाही आरोपींना अटक करण्यात आली असून दोषी 5 पोलिसांचे निलंबन करण्यात आलंय. त्यामुळे जनतेनं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन मागे घेण्याच आवाहन केलं. तसंच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सरकार ठोस पाऊले उचलणार आहे. यामध्ये

1) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवण्यात येईल2) दिल्लीतील महत्वाच्या भागात पोलिसांची गस्त वाढणार3) बसेसमध्ये जीपीएस सिस्टिम बसवणार4) भारतीय दंड संविधानात सुधारणा करणार5) दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासाठी प्रयत्न6) दोषी 5 पोलिसांचे निलंबन करणार7) प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात चालवणार

close