फायर ब्रिग्रेडची प्रेरणादायी कामगिरी

December 4, 2008 5:00 AM0 commentsViews: 3

4 डिसेंबर, मुंबईविनोद राऊतमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई फायर ब्रिगेडच्या जवानांनी असामान्य कामगिरी बजावली. ताजमध्ये फायर फायटिंग करताना या जवानांनी तब्बल 300 लोकांची सुटका केली. एरवी आगीशी झुंज देणार्‍या या जवानापुढे यावेळचं हे आव्हान वेगळंच होतं. त्यांना एकाचवेळी आगीशी आणि दहशतवाद्यांशी झुंज तर द्यायची होतीच सोबत लोकांनाही बाहेर काढायचं होतं.आणि या तीनही फ्रंटवरती या जवानांनी जबरदस्त कामगिरी करून दाखवली. यापूर्वीर्ही अनेक मोहिमांचा अनुभव असणार्‍या सहमुख्य अग्निशमन अधिकारी करगुप्पीकर यांनी ऑपरेशन ताजची संपूर्ण आखणी केली होती. गृहसचिव चिकला झुत्शी यांनाही त्यांनी बाहेर काढलं. मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी स्कायलिफ्टवर हॅन्डग्रेनेड फेकले आणि गोळीबारही केला. यात नरिमन पॉईंट फायर स्टेशनचा एक जवान जखमी झालाय. सध्या तो नायर रुग्णालयात उपचार घेतोय. या स्कायलिफ्टवर गोळीबाराच्या खूणा मात्र अजूनही ताज्या आहेत.

close