दिल्लीत सामूहिक बलात्कार पीडित तरूणीची प्रकृती स्थिर

December 20, 2012 3:21 PM0 commentsViews: 15

20 डिसेंबर

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कारातल्या पीडित तरुणीचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ती व्हेंटीलेटरवर आहे. तिच्या आतड्यांमध्ये गंभीर जखमा आहेत. दरम्यान, तिच्या मित्रानं आरोपींपैकी एकाची ओळख पटवलीय. आज त्यांची तिहार जेलमध्ये ओळख परेड झाली. दोन आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची पोलीस चौकशी करत आहेत. याप्रकरणी हरियाणा आणि बिहारमध्ये पोलिसांनी छापे टाकलेत. ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसमधून सर्व पुरावे जमा करण्यात आले आहेत. तसंच आरोपींचे कपडे फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवण्यात आले आहे.

close