विनोद तावडेंनी केली स्वत:च्या सुरक्षेत कपात

January 1, 2013 1:20 PM0 commentsViews: 27

01 जानेवारी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी नव्या वर्षात एक चांगलं पाऊल उचललंय. विनोद तावडे यांनी स्वतःच्या सुरक्षेत कपात केलीय. आपल्या सुरक्षा ताफ्यातले 10 पैकी 8 सुरक्षारक्षक त्यांनी परत पाठवले आहेत. मुळात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यातच अनेक पोलीस व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यामुळे पोलिसांवर कमालीचा ताण पडतोय. हा ताण कमी व्हावा यासाठीच तावडेंनी आपल्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा इतर नेत्यांनीही आपल्या सुरक्षेत कपात करून पोलिसांवरचा ताण कमी करावा, अशी अपेक्षा विनोद तावडेंनी व्यक्त केलीय.

close