बेस्टची वीज एप्रिलमध्ये महागणार

December 27, 2012 12:59 PM0 commentsViews: 10

27 डिसेंबर

आर्थिक डबघाईत आलेल्या बेस्टने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. बेस्टची वीज येत्या एप्रिल महिन्यापासून महागणार आहे. मुंबईतील दहा लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. बेस्ट वाहतुकीतला 1,187 कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करावी लागणार असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. पुढच्या 3 आर्थिक वर्षांमध्ये ही तूट भरून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

close