दिल्लीत आंदोलक-पोलिसांत वादावादी

December 30, 2012 11:06 AM0 commentsViews: 2

30 डिसेंबर

दिल्लीत सामूहिक बलात्कार पीडित तरूणीवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तिला न्याय मिळावा यासाठी दिल्लीत तरूणाईची आंदोलन सुरूत आहे. जंतर मंतर मैदानावर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलंय. अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. जंतरमंतरला आंदोलकांना रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यावरुन अभाविप आणि पोलिसांमध्ये वाद झालाय. त्यानंतर या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.

close