दिल्ली गँगरेप : राष्ट्रपती भवनाबाहेर निदर्शनं

December 21, 2012 10:23 AM0 commentsViews: 23

21 डिसेंबर

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी अजूनही देशभरात निदर्शनं सुरू आहेत. आज दिल्लीत महिला संघटनांनी थेट राष्ट्रपती भवनावरच धडक दिली. हजारो महिलांनीचा जमाव राष्ट्रपती भवनाच्या गेटवर धडकला. संतप्त महिलांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसंच दिल्लीत कायदा सुव्यवस्थाच नसल्याचा आरोप करत पोलीस यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे इंडिया गेटवरही महिला संघटनांनी निदर्शनं केली. पण आरोपींना फाशी देण्याबाबत मात्र महिला संघटनांमध्ये मतभेद पाहण्यास मिळाले. जंतरमंतरवर अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने मोर्चा काढला होता. आरोपींना फासावर लटकवण्यात यावं अशी मागणी केजरीवाल यांनी केली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणातील पाचव्या आरोपाली अटक केलीय. त्याचं नाव अजून कळू शकलेलं नाही, पण नोएडामधल्या एका कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. दरम्यान पीडित तरुणीचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ती व्हेंटिलेटरवर आहे.

close