दिल्लीत ‘महिला हेल्पलाईन’चा उडाला बोजवारा

January 1, 2013 1:39 PM0 commentsViews: 6

01 जानेवारी

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर दिल्ली सरकारानं गाजावाजा करत सुरू केलेल्या महिला हेल्पलाईनचा आठ दिवसातच बोजवारा उडाला. हेल्पलाईन क्रमांक सध्या बंद पडले आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी दिल्ली सरकारनं 24 तास हेल्पलाईन सेवा सुरु केली होती. मोबाईल आणि लँडलाइनवरुन 181 क्रमांकावर थेट तक्रार करा, असं जाहीर करण्यात आलं होतं. पण हे दावे 8 दिवसातच फोल ठरले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारला तरूणाईच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे.

close