सचिनचा वन डे क्रिकेटला अलविदा

December 23, 2012 9:45 AM0 commentsViews: 7

23 डिसेंबर

क्रिकेटचा देव, विक्रामादित्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना पत्र लिहून सचिननं आपला निर्णय जाहीर केलाय. पाकिस्तान सीरिजसाठी निवड समिती वन डे टीमचं सिलेक्शन करणार आहे. त्याअगोदर सचिननं हा निर्णय जाहीर केलाय.

वर्ल्ड कप जिंकणं हे आपलं स्वप्न होतं आणि आपली ही स्वप्नपूर्ती झाली आहे. म्हणून 2015 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने नवी आणि तरुण टीम बांधण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आपण निवृत्त होत असल्याचं सचिननं आपल्या पत्रात म्हटलंय. सचिनची वन डे कारकिर्द ही प्रदिर्घ राहिलीये. 463 वन डे मॅचमध्ये सचिननं 44 च्या ऍव्हरेजनं तब्बल 18,426 रन्स केले आहेत. यात सचिननं 49 सेंच्युरी तर 96 हाफ सेंच्युरी ठोकल्यात. सचिन आणि रेकॉर्ड्स हे एक अतूट नातं आहे आणि म्हणूनच सचिनला विक्रमांचा बादशहा म्हटलं जातं. सर्वाधिक वन डे मॅच, सर्वाधिक रन्स, सर्वाधिक सेंच्युरी असे वन डे क्रिकेटमधील सर्व रेकॉर्ड हे सचिनच्या नावे जमा आहेत. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये डबल सेंच्युरी ठोकत सचिननं सर्वात पहिल्यांदा 200 रन्स करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. पण आता हाच मास्टर ब्लास्टर वन डे क्रिकेटमध्ये आपल्याला पीचवर दिसणार नाहीये.

close