विजयकुमार गावित यांच्यावर कारवाई करण्याचा कोर्टाचा आदेश

December 21, 2012 10:36 AM0 commentsViews: 7

21 डिसेंबर

संजय गांधी निराधार योजनेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांना कोर्टानं धक्का दिलाय. गावितांवर चार आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात तीन सरकरी योजनांमध्ये गैरव्यवहार झालाय. त्यामध्ये 750 बोगस लाभार्थी आढळले होते. याबद्दल चौकशी होऊन गुन्हा दाखल होता. संबंधित सरकारी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

close