सिंचनच्या SIT चौकशीला भाजपचा विरोध

January 1, 2013 1:49 PM0 commentsViews: 2

01 जानेवारी

सिंचन घोटाळाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या, एसआयटीवर आणि एसआयटीसाठी निश्चित केलेली कार्यकक्षा यावरून विरोधक आणि सरकारमध्ये चांगलाच वाद सुरू झालाय. ही एसआयटी चौकशी मान्य नसल्याची रोखठोक भूमिका भाजपनं घेतली आहे. या एसआयटीमध्ये गुन्हेगारांना शोधण्याची तरतूद नसल्याचा आरोप भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय. तसंच याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिलाय. तर सरकारनं विरोधकांचे आरोप धुडकावून लावलेत. चितळे समितीवर कुठलाही दबाव नसल्याचा दावा जलसंपदामंत्री सुनील तटकरेंनी केलाय. तसंच फौजदारी स्वरूपाची मागणी राजकीय असल्याचा आरोप तटकरेंनी केलाय.

close