महाराष्ट्रात महिला आयोगाचं अध्यक्षपद तीन वर्षांपासून रिक्त

December 23, 2012 10:02 AM0 commentsViews: 4

23 डिसेंबर

महिलांवरील अत्याचारांविरोधात देशभर असंतोष असताना महाराष्ट्रातल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. गेल्या तीन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. अनेकदा मागणी करूनही सरकार महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर का नियुक्ती करत नाही असा सवाल आता विचारला जातोय. 2009 मध्ये रजनी सातव यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळं मोजके सदस्य आणि कर्मचार्‍यांच्या भरवश्यावर अतिशय संथ गतीनं आयोगाचं काम सुरू असते. महिलांवरच्या अत्याचाराबाबत स्वत:हून सु-मोटो याचिका दखल अधिकार आयोगाला आहे. बलात्कार, हुंडाबळी, कामाच्या ठिकानी लैंगिक छळ, परदेशात लग्न करून फसवल्या गेलेल्या महिलांच्या तक्रारी प्रामुख्यानं आयोगाकडे येत असतात. नुकत्याच संपलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सर्वपक्षांच्या महिला आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तर लवकरच मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असं आश्वासन संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलीय.

close