सोनिया गांधींनी केली आंदोलक तरूणाईशी चर्चा

December 23, 2012 10:13 AM0 commentsViews: 2

23 डिसेंबर

शुक्रवारी तरूणाईने राष्ट्रपतीभवनाबाहेर आंदोलन केल्यानंतर रात्री या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी 10 जनपथवर धडक मारत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींना चर्चेचं आवाहन केलं. त्यानंतर आज सकाळी सोनिया आणि राहुल गांधी यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी आज चर्चा केली. ही चर्चा समाधानकारक झाली. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्याबाबत कायद्यात बदल करण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली. पण जोपर्यंत सरकार ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलंय.

close