टेंभलीला वीजेचा ‘आधार’ तुटला

December 21, 2012 10:55 AM0 commentsViews: 7

21 डिसेंबर

नंदुरबार जिल्ह्यातलं टेंभली गाव चर्चेत आलं ते आधार कार्डचं लाँचिंग याच गावात केल्यानंतर..पण आधारच्या लॉंचिंगमुळे प्रकाशात आलेलं टेंभली पुन्हा अंधारात गेलंय. वीजबील थकल्यामुळे या गावाचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय. गेल्या वर्षी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातल्या या टेंभली गावात आधारच्या लॉंचिंगचा जंगी कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्तानं शासकीय यंत्रणेनं रंगरंगोटी करुन टेंभलीचं रुप पालटून टाकलं होतं. त्याचाच एक भाग म्हणजे वीज कनेक्शन नसलेल्या वीजही पुरवण्यात आली. राजीव गांधी मोफत वीज जोडणी योजनेअंतर्गत वीज कनेक्शन देण्यात आलं खरं, पण गरिबीत काहीही फरक न पडल्यानं वीज बिलाची थकबाकी लाखांच्या घरात गेली आणि अखेरीस टेंभली पुन्हा एकदा अंधारात गेलंय.

close