दोन दिवसात 6 बलात्काराच्या घटना उघड

December 27, 2012 4:56 PM0 commentsViews: 16

27 डिसेंबर

दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्याविरोधातला प्रचंड रोष सर्वत्र व्यक्त होत असतानाच दोन दिवसांत देशभरात 6 बलात्काराच्या वेगवेगळ्या घटना उघड झाल्या आहेत. या सर्व प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली आहेत तर 2 जण फरार आहे. राजधानीत चालत्या बसमध्ये तरूणीवर बलात्काराच्या घटनेनंतर आज चालत्या गाडीत एका 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. जयपूरहून दिल्लीत आलेल्या 42 वर्षांच्या महिलेवर तिघांनी बलात्कार केला. पोलिसांनी या संदर्भात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पीडित महिलेनं पोलिसांकडे दिलेल्या जबानीत तिच्याच एक परिचित व्यक्तीने त्याच्या दोन साथीदारांसह बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर या महिलेकडील पैसे लुटण्यात आले आणि तिला कालकाजी परिसरात फेकून दिलं. पीडित महिलेनं आपल्या मैत्रिणाला फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर या महिलेनं थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

आश्रमशाळेतील विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळेत सामूहिक बलात्काराची घटना समोर आलीय. आश्रमशाळेतल्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी सुरगाणा पोलिसांत दिलीय. ही विद्यार्थीनी 12 वीमध्ये शिकते. पीडित मुलीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विशेष म्हणजे रविवारी घडलेली ही घटना आदिवासी विकास प्रकल्प अधिका-यांकडूनच दडपण्याचा प्रयत्न होतोय. 4 जणांनी हा बलात्कार केल्याचा मुलीनं आरोप केलाय. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणाबद्दल कुठेही वाच्यता न करण्याबाबत मुलींच्या पालकांना धमकावण्यात आलंय

भंडार्‍यात भोंदू बाबाचा महिलेवर बलात्कार

भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातल्या चिरमाटी गावात बलात्काराची घटना घडली आहे. एका भोंदू बाबानं महिलेवर बलात्कार केला. प्रभाकर मस्के असं या भोंदू बाबाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला आणि त्याचा शिष्य लक्ष्मण सहारे यांना अटक केली आहे. माझ्यासोबत आलीस, तर तुला मुलगा होईल, अशी फसवणूक करून या बाबाने तिच्यावर बळजबरी केली.

तुर्भेमध्ये कर्णबधिर मुलीवर बलात्कार

नवी मुंबईत तुर्भे परिसरात चीता कॅम्प परिसरात बुधवारी सायंकाळी दोन युवकांनी एका 17 वर्षीय कर्णबधिर मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोन तरुणांनं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींचा अद्याप शोध न लागल्याने परिसरातील लोकांमध्ये रोष आहे.