‘उजणी’त फक्त 1 टक्का पाणी शिल्लक

January 3, 2013 11:41 AM0 commentsViews: 51

03 जानेवारी

दुष्काळाची धग आता तीव्रतेनं जाणवू लागलीय. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला उपयुक्त पाण्याचा साठा आता फक्त 1 टक्का शिल्लक राहिल्यानं उभं पीक आणि साखर कारखाने धोक्यात आले आहेत. तर मृतसाठ्यात 60 टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणातलं पाणी निच्चांकी स्तरावर आल्यानं अग्रक्रमानुसार हे पाणी पहिले पिण्यासाठी नंतर शेतीसाठी आणि शेवटी उद्योगासाठी असा क्रमा आहे. मात्र पाणी पिण्यासाठी दिल्यानंतर, पाणी शेतीसाठी न देता उद्योगांसाठी पाणी देण्यात येत असल्यानं शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. शेतीसाठी पाणी न मिळाल्यास लाखो हेक्टर ऊस, फळबागा, आणि इतर पिकांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे तातडीनं निर्णय घेऊन पाण्यासाठी शेतीला अग्रक्रम द्यावा अशी मागणी होतेय.

close