दिल्लीत तरूणाई आज पुन्हा रस्त्यावर

December 23, 2012 10:20 AM0 commentsViews: 12

23 डिसेंबर

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ दिल्लीत तरुणांच्या संतापाचा काल झालेला उद्रेक अजूनही शमलेला नाही. पोलिसांनी जमावबंदी लागून करुनही आज पुन्हा एकदा आंदोलक इंडिया गेटवर पोहोचले आहेत. कालच्या आक्रमक आंदोलनानंतर आज राष्ट्रपती भवनाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. हे आंदोलक रस्त्यावरच ठिय्या मांडून बसल्यानं रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झालीये. दरम्यान या भागातील 7 मेट्रो रेल्वे स्टेशन्स बंद ठेवली आहेत तरीही आंदोलक इंडिया गेटकडे निघाले आहेत. दरम्यान, कालच्याप्रमाणेच आजही आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे सुरू केले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलीस अटोकात प्रयत्न करत आहे.

close