नागपूर मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव मंजुरीच्या वाटेवर

December 21, 2012 11:43 AM0 commentsViews: 6

21 डिसेंबर

गेल्या वर्षभरापासून उपराजधानी नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेचा प्रकल्प आता मंजुरीच्या वाटेवर येऊन ठेपला आहे. मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव लवकर मंजुरीसाठी दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शहराच्या विकासाच्या पायभरणीची मुहूर्तमेढ रोवली गेली असताना दिल्ली,मुंबई,पुणे पाठोपाठ नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. गेल्या वर्षाभरापासून मेट्रो प्रकल्पाची चर्चा सुरू होती या प्रकल्पाचा मास्टरप्लॅनही तयार करण्यात आला असून प्रतिक्षा आहे ती मंजुरीची. या घोषणेबरोबरच नागपूरजवळ बुटीबोरी इथं एक विशेष उद्योग क्षेत्र उभारण्याबरोबरचं गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयं तर नागपूरमध्ये कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच गोसिखुर्दच्या प्रकल्प ग्रस्तासाठी विशेष पॅकेज देण्याची घोषणा राज्य सरकारकडून केली जाणार आहे. त्याचबरोबर विदर्भाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. जादूटोणा विरोधी विधेयक मात्र पुन्हा बारगळलं. पण हे विधेयक बाद होऊ नये म्हणून त्यास मुदतवाढ घेण्यात आली आहे. आता पुढच्या अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार आहे.

close