‘तिचं’ नाव जाहीर करायला हरकत नाही’

January 2, 2013 9:44 AM0 commentsViews: 5

02 जानेवारी

दिल्लीत अमानुष सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या तरूणीचं नाव सार्वजनिक करायला तिच्या कुटुंबीयांची हरकत नसल्याचं म्हटलंय. पीटीआयनं हे वृत्त दिलंय. बलात्कारविरोधी कायद्याला या मुलीचं नाव द्यावं अशी मागणी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी केली होती. कायद्याला तिचं नाव देणं, हा सन्मानच असेल अशीही प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिलीय. शशी थरूर यांनी काल मंगळवारी टिवट्‌रवर याबाबत प्रतिक्रिया नोंदवली होती. दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीची ओळख आता का लपवली जातेय, हे मला कळत नाही. तिचं खरं नाव घेऊन आपण तिचा सन्मानच करू. तिच्या पालकांची हरकत नसेल तर सुधारित बलात्कारविरोधी कायद्याला तिचं नाव दिलं जावं. ती एक व्यक्ती होती, फक्त प्रतीक नाही असं टिवट् शशी थरूर यांनी केलं होतं.

close