‘तिचा’ फेसबुकवर खोटा फोटो अपलोड

January 3, 2013 12:02 PM0 commentsViews: 23

03 जानेवारी

दिल्लीत सामूहिक बलात्कार पीडित तरूणीची ओळख जाहीर होऊ द्यायची की नाही यावरुन वाद सुरू असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. दिल्लीतील बलात्कार पीडित तरुणीचा फोटो म्हणून फेसबुकवर सध्या खोटे फोटो अपलोड केले जात आहे. पण हा फोटो केरळमधील एका तरूणीचा असल्याचं उघड झालंय. त्यामुळे खर्‍या तरूणीला नाहक त्रास सहन करावा लागतोय. या मुलीच्या वडिलांनीच केरळ पोलिसांकडे तशी तक्रार दाखल केलीय.

दिल्लीत पीडित तरूणीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद देशभरात उमटले. सोशल मीडिया म्हणजे फेसबुक,टिवट्‌रवर संतापाचा वणवा पेटलाय. आरोपींना फाशीची शिक्षा द्या, कायद्यात बद्दल करा, कायदे कठोर करा अशा अनेक मागण्या,सुचनाचा पाऊस पडला. पण काही फेसबुकबहाद्दरांनी पीडित मुलीच्या मृत्यूनंतर तिला न्याय मिळावा यासाठी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला आणि पुर्वीचा (यांना जो आवडला तो) एक फोटो जोडून सदरील पीडित तरूणी हीच होती असा खोटा फोटो पसरवला जात आहे. धक्कादायक म्हणजे ज्या दिवशी त्या तरूणीचं निधन झालंय त्याच दिवशी संध्याकाळी तिचा फेक फोटो लिंक झाला. मात्र सदरील तरूणीचा फोटो हा केरळ मधील एका तरूणीचा आहे. तिलाही बाब कळताच जबरदस्त धक्काच बसला. तिने ही बाब तिच्या वडीलांना सांगितली. याप्रकरणी तिच्या वडिलाने पोलिसांत तक्रार दाखल केलीय. कृपा करून असले फोटो तरी अपलोड करू नका अशी विनंतीही तरूणीच्या वडिलांनी केलीय.

close