जालन्यात भीषण दुष्काळ, गावं पडली ओस

December 26, 2012 10:14 AM0 commentsViews: 98

26 डिसेंबर

ऐन हिवाळ्यातच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसत आहे. मराठवाड्यातील 3299 गावांची अतिम आणेवारी 50 पैशांपेक्षा खाली आलीये. दुष्काळाचा सर्वात जास्त फटका बसतोय तो जालना जिल्ह्याला..जिल्हातील सर्वच गावात भीषण दुष्काळ आहे. शेतातील पिकं जळून गेली आहे. शिवारात हाताला काम नाही. खिशात पैसा नसल्यानं संपूर्ण गावं ओस पडली आहे. अनेक घरांना कुलपं लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याला दीड हजार रूपये मोजावे लागत आहे. मराठवाड्याला यंदा पावसाने पाठ फिरवली त्यामुळे मराठवाड्याचं मुख्य धरणं जायकवाडीची पाणी पातळी खालावली आहे. जायकवाडीला भंडारदरा धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आलं होतं. पण हे धरणात पोहचेपर्यंत दीड टीएमसीच पोहचलं होतं.यानंतरही 9 टीएमसी पाणी सोडण्यात येईल अशी घोषणाही करण्यात आली. पण तोपर्यंत मराठवाड्यातील जनतेला दुष्काळाला सामोरं जावं लागतं आहे.

close