पुण्यात ‘थर्टीफस्ट’च्या पार्ट्यामध्ये दारू नको :राष्ट्रवादी

December 31, 2012 9:50 AM0 commentsViews: 2

31 डिसेंबर

दिल्लीतील पीडित तरूणीच्या मृत्यूमुळे सेलिब्रेशन करायचं नाही असा निर्धार अनेकांनी केला आहे. तर पुण्यात राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. 31 डिसेंबरसाठी आयोजित करण्यात आलेल्या खासगी पार्ट्यामध्ये दारुचा वापर होऊ नये यासाठी राष्ट्रवादीनं आज पुण्यात आंदोलन केलं, तसंच अशा पाटर्‌यांचे बॅनर्स फाडले. तसंच महिलांनी बाहेर पडताना कोणती काळजी घ्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकं वाटण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरात शिवसेनेनं 'थर्टी फस्ट'च्या पाटर्‌यांना रात्री 1 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय तसंच शिवसेनेनं पब,डिस्को,बारवर नजर ठेवण्यासाठी जागल्यांचं पथक तैनात केलंय.

close