अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी दुष्काळावरून गदारोळ

December 21, 2012 7:52 AM0 commentsViews: 3

21 डिसेंबर

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे. पण आज दुष्काळाच्या प्रश्नावर विधानसभेत गदारोळ झालाय. दुष्काळाच्या मुद्यावर सभागृहात चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरकारनं दुष्काळाबाबत ठोस उपाययोजना जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली. तसंच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर उत्तर देण्याची मागणी विरोधकांनी केली, पण सरकारनं ठोस आश्वासन न दिल्यानं विरोधक नाराज झाले. दरम्यान, राज्यातील 6 हजार दोनशे 50 दुष्काळग्रस्त गावातल्या शेतकर्‍यांची पीक कर्ज वसुली आणि जप्तीला स्थगिती देण्यात आलीय. शेतकर्‍यांच्या कर्जाची फेररचनाही करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल विधानसभेत ही माहिती दिलीय.

close