‘SIT टीममध्ये एक सदस्य कॉन्ट्रक्टरचेच सल्लागार’

January 2, 2013 9:56 AM0 commentsViews: 6

02 जानेवारी

सिंचनप्रश्नी राज्य सरकारने स्थापन केलेल्या SIT टीमचे एक सदस्य व्ही.एम.रानडे कॉन्ट्रक्टरचेच सल्लागार असल्याचं उघड झालंय. तारळी धरणाचे काम तीन ठेकेदारांना देण्यात आले होते. यात मिस्टर आणि मिसेस प्रसाद सेव कंन्स्ट्रकशन कंपनी लिमिटेड, ए – प्रभाकर कंपनी लिमिटेड आणि मिस्टर आणि मिसेस गॅमन प्रोग्रेसिव्ह लिमिटेड या तिन्हीही कंपन्यांसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून व्ही.एम. रानडे यांनी काम केलं आहे. त्यामुळे रानडे हे कसे निष्पक्ष तपास करण्यासाठी पात्र आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात मेधा पाटकर यांनीही ही बाब उघड केली होती. सरकारने सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली यात ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीमध्ये निवृत्त वित्त सचिव ऐ.के.डी जाधव, निवृत्त पाटबंधारे सचिव व्ही.एम रानडे, आणि निवृत्त कृषी आयुक्त कृष्णा लव्हेकर, या तिघांचा समावेश करण्यात आलाय.

close