म्हाडाच्या घरासाठी लुटणार्‍या 2 भामट्यांना अटक

January 3, 2013 1:56 PM0 commentsViews: 40

03 जानेवारी

म्हाडाची घरं मिळवून देण्याचं आमिष दाखवून लाखो रूपये लुटणार्‍या दोघांना डोंबिवली पोलिसांनी अटक केलीय. आनंद मालाडकर आणि आनंद कांबळे अशी दोघांची नावं आहेत. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे दोघं म्हाडाची खोटी ऍलॉटमेंट लेटर आणि घरांच्या चाव्याही देत आणि पैसे उकळत. मात्र घर मिळत नसल्यानं काही लोकांनी थेट म्हाडाचं कार्यालय गाठलं. म्हाडाच्या अधिकार्‍यांना ऍलॉटमेंट लेटर दाखविल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनाही मालाड इथून पोलिसांनी अटक केलीय. कल्याण कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय.

close