अजित पवार आता ‘पॉवरफुल’

December 26, 2012 10:25 AM0 commentsViews: 118

26 डिसेंबर

सिंचन घोटाळ्यावरून झालेल्या आरोपांमुळे अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन 72 दिवसांचा सन्यास पत्कारला होता. मात्र अजित पवार 'सत्ताशक्ती' पासून जास्त काळ दूर राहु शकले नाही. नागपूर अधिवेशनाच्या पूर्वीच अजित पवार यांनी अचानक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळात पुनारागमन केलं. पण बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरणारे अजित पवार यांना अखेर अर्थ व नियोजन आणि उर्जा खातं मिळालं आहे. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भातला आदेश जारी केला आहे. अजित पवारांनी अर्थ आणि नियोजन खात्याच मागितलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी उर्जा खात्याचीही जबाबदारी अजित पवारांवर सोपवली आहे. म्हणजे मंत्रिमंडळात परतल्यानंतर अजित पवारांकडे पुन्हा एकदा पूर्वी त्यांच्याकडे जी खाती होती, तीच त्यांना पुन्हा मिळाली आहेत. बारामतीमध्ये झालेल्या 93 व्या नाट्य संमेलनात अजित पवारांनी माझे हात बळकट करावे अशी जाहीरसभेत मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही मागणीचा पुरवढा करत लवकरच पदभार दिले जातील असे संकेत दिले होते. अखेर आता अजितदादांची गाडी पूर्ण ताकदीनिशी पूर्वपदावर आली आहे.

close