नरेंद्र मोदींना कोर्टाचा धक्का, लोकायुक्तांची नियुक्ती योग्य !

January 2, 2013 10:05 AM0 commentsViews: 3

02 जानेवारी

गुजरात लोकायुक्तांच्या नियुक्तीच्या वादात मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टानं झटका दिलाय. राज्यपाल कमला बेनिवाल यांनी आर.ए.मेहता यांची लोकायुक्तपदी केलेली नियुक्ती योग्य असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. मेहता यांच्या नियुक्तीला नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. गुजरात सरकारची ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

close