अतिरेक्याच्या वस्तूंवर ‘ मेड इन पाकिस्तान ‘ चा लोगो

December 4, 2008 12:35 PM0 commentsViews: 1

3 डिसेंबर, मुंबई मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या अतिरेक्याकडून पाकिस्तानी वस्तू सापडल्यात. याशिवाय अतिरेक्यांनी मुंबईत येण्यासाठी ज्या भारतीय अल कुबेर या बोटीचा वापर केला, त्यातही पाकिस्तानी वस्तू मिळाल्या आहेत. यामुळे हे अतिरेकी पाकिस्तानातूनच आले हे स्पष्ट होतंय. मुंबई पोलिसांनी कुबेर बोटीची झडती घेतली तेव्हा वेगवेगळ्या 76 वस्तू सापडल्या. त्यात टूथपेस्ट, मिल्क पावडर, शेव्हिंग क्रीम, माचीस, टीश्यू पेपर, प्लास्टिक कॅन, गोण्या, कपडे धुण्याचा ब्रश अशा वस्तूंचा समावेश होता. या सगळ्या वस्तूंवर मेड इन पाकिस्तान असं लिहिलं होतं. काही वस्तू पाकिस्तानात बनवल्या गेल्यात, असं त्यावर स्पष्टपणे लिहण्यात आलंय. या बोटीच्या मालकालाही गुजरातमधून मुंबईला चौकशीसाठी आणण्यात आलंय.

close