मालेगावमध्ये यंत्रमाग कामगारांचा ‘नो स्मोकिंग डे’

December 31, 2012 12:26 PM0 commentsViews: 40

31 डिसेंबर

मालेगावमध्ये वर्षभर वेगवेगळ्या व्यसनांमध्येे अडकलेल्या यंत्रमाग कामगारांनी आजचा दिवस नो स्मोकिंग डे म्हणून पाळण्याचं ठरवलंय. कामाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळं मालेगावतले 70 टक्के यंत्रमाग कामगार व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झालाय. याबाबत जाणीव निर्माण व्हावी या उद्देशानं यंत्रमाग असोसिएशननं हा अभिनव उपक्रम राबवलाय. या उपक्रमात सर्व यंत्रमाग कामगारांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला असून स्थानिक नागरीकसुद्धा या उपक्रमात सहभागी झाले आहे.

close