गोंदियात नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात पंधरा दिवसात 5 ठार

January 5, 2013 10:28 AM0 commentsViews: 6

05 जानेवारी

गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी तालुक्यातील भिवखिडकी गावात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातलाय. येथील रहिवासी भाग्यश्री नेवारे या तरुणीला वाघाने ठार केलंय. या भागातील गेल्या पंधरा दिवसातली ही पाचवी घटना असुन अजूनही वनविभाग या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात अपयशी ठरलाय. शेतात काम करणार्‍या तसंच सरपणासाठी जंगलातून लाकडं आणायला गेलेल्या महिलांवर या वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केलंय. वाघाच्या दहशतीने या परिसरातील लोक घराबाहेरच पडत नाहीत. वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावलेत पण अजून त्यांना यश आलं नाही. त्यामुळे संतप्त गावकर्‍यांनी तहसिलदार कार्यलयावर मोर्चा काढला आणि निदर्शनं केली.

close