अभिजीत मुखर्जी यांना काँग्रेसचा दिलासा

December 28, 2012 11:15 AM0 commentsViews: 4

28 डिसेंबर

दिल्लीत महिलांवरील अत्याचाराविरोधात लढणार्‍या महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रपतीपुत्र आणि काँग्रेसचे खासदार अभिजीत मुखर्जी यांना काँग्रेसनं दिलासा दिलाय. अभिजीत मुखर्जी यांनी आपलं वक्तव्य मागे घेत माफी मागितल्यानं त्यांच्यावर कारवाईची गरज नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. महिलाविरोधातल्या वाढत्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असताना अभिजीत मुखर्जी यांनी मेणबत्या मिरवणं ही आज फॅशन झालीय अशी वादग्रस्त टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र पडसाद उमटले. विरोधांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मुखर्जी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.

close