‘पुन्हा संतोष माने होऊ देणार नाही’

January 3, 2013 3:18 PM0 commentsViews: 25

03 जानेवारी

पुण्यात घडलेल्या संतोष माने प्रकरणानंतर ड्रायव्हर कंडक्टर्सच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला प्रशासनाने सुरुवात केली. जिथे एसटी कामगार या ताणतणावाचे बळी ठरतायत तिथे रोजच्या रोज पुण्यातल्या वाहनांच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यांवर पीएमपीची बस चालवणार्‍यांच्या आयुष्यात हे साहजिकच… गर्दीतून रस्ता शोधत वाहन चालवताना शरीरावर येणार्‍या ताणामुळे पाठदुखी, मानदुखी असे आजार अनेक ड्रायव्हर्सना होतात. तर लोकांशी होणारे वादविवाद आणि प्रदुषण याचा त्रास कंडक्टर्सना होतो. आजारांच हे वाढणारं प्रमाण लक्षात घेऊन असे प्रकार घडू नयेत यासाठी पुण्यामध्ये पीएमपीएमएल तर्फे एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पीएमपीच्या कंडक्टर्स आणि ड्रायव्हर्सना योगासनांचं प्रशिक्षण देण्यात आलं. थोडासा व्यायाम आणि त्याच्या जोडीला होणार्‍या आरामामुळे त्यांचं शारिरिक स्वास्थ सुधारेल अशा हेतूने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्याच कार्यशाळेमध्ये एकूण 50 कर्मचारी सहभागी झाले होते. टप्प्या टप्प्याने पीएमपीच्या सगळ्या 1800 कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या कार्यशाळेनंतर बर्‍याच प्रमाणात ताणतणाव कमी झाल्याचं जाणवल्याची भावना पीएमपीच्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. तर पुन्हा एखादा संतोष माने होऊ नये यासाठी हा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

close