नागपुरात ट्रकची-रिक्षाला धडक, विद्यार्थ्याचा मृत्यू

December 26, 2012 12:58 PM0 commentsViews: 6

26 डिसेंबर

नागपूरच्या वर्धमान नगर भागात आज सकाळी शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणार्‍या ऑटो रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा घटना स्थळीच मृत्यू झाला. तर एक विद्यार्थी जखमी झाला आहे. रियांशु जैन असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो पहिल्या वर्गात शिकत होता. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात लोकांची घटनास्थळी गर्दी केली होती. संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड केली. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

close