सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कार प्रकरणी 16 कर्मचारी निलंबित

December 31, 2012 12:35 PM0 commentsViews: 58

31 डिसेंबर

नाशिक येथील सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कारप्रकरणी पळसण आश्रमशाळेच्या 16 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. या कारवाईच्या विरोधात विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलंय. गेल्या रविवारी या आश्रमशाळेत 12 वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. पण मुळात रेक्टरसारखी पदं रिक्त असताना या रोजंदारीवरच्या कर्मचार्‍यांवर अचानक का बडगा उगारला जातोय असा सवाल केला जातोय. आदिवासी विभागाचा उफराटा कारभार यामुळे उजेडात आला.

close