ज्येष्ठ समाजवादी नेते किशोर पवार यांचं निधन

January 2, 2013 11:14 AM0 commentsViews: 13

02 जानेवारी

ज्येष्ठ समाजवादी नेते किशोर पवार यांचं आज पहाटे निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले ते अग्रणी नेते होते. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती संग्राम आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातला त्यांचा सहभाग मोलाचा होता. त्यांनी साखर कामगारांची पहिली यूनियन स्थापन केली होती. त्यांचं पार्थिव 11 ते 2 या वेळेत त्यांच्या सिंहगडमधल्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनमध्ये त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

close