‘त्या’ तरूणीची प्रकृती अत्यंत नाजूक

December 28, 2012 12:51 PM0 commentsViews: 7

28 डिसेंबर

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित तरुणीची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. शुक्रवारी दुपारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन काढून तिच्या प्रकृतीची माहिती दिली. सिंगापूरमध्ये सध्या या तरुणीवर उपचार सुरू आहेत. येते काही दिवस हे अत्यंत महत्वाचे असल्याचं या मुलीवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितलंय. पीडित तरूणीला दोन दिवसांपूर्वी सिंगापूरमधील प्रसिद्ध माऊँट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. बुधवारी रात्री पीडित मुलीला एअर ऍम्ब्युलन्सने सिंगापूरला नेण्यात आलं. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि मुलीचे आई-वडीलही तिच्यासोबत आहेत.

close