राज ठाकरेंचं पदाधिकार्‍यांना खरमरीत पत्र

January 3, 2013 3:26 PM0 commentsViews: 5

03 जानेवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांना एक खरमरीत पत्रं लिहीलंय. मनसेच्या कोणत्याही अंगिकृत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी परस्पर इतर पदाधिकार्‍यांच्या नेमणुका करू नयेत, असा आदेश राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे दिलाय. मनसेच्या अनेक अंगिकृत संघटनांच्या नेमणुका परस्पर नेत्यांच्या आणि अध्यक्षांच्या परवानगी शिवाय होतात आणि अशा स्वरूपाच्या तक्रारी राज ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत हे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर मनसेच्या रस्ते अस्थापना विभागाची मध्यवर्ती कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आलीय.

close