उद्योगधंद्यांसाठी वीज स्वस्त होणार

December 26, 2012 1:31 PM0 commentsViews: 5

26 डिसेंबर

येतं नवं वर्ष उद्योजकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलंय. महाराष्ट्रातील महावितरणनं उद्योगांसाठीचे वीजेचे दर कमी केले आहेत. रात्रीच्या वेळी वीजेच्या दरात कपात करण्यात आली आहेत. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वीज वापरणार्‍या उद्योगांना या दरकपातीचा फायदा होणार आहे. आता प्रती युनिट अडीच रूपयाची सवलत या उद्योगांना मिळणार आहे. ही दरकपात 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. एकीकडे राज्यात 12-12-12 चा मुहूर्त साधून राज्य लोडशेडिंगमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता मात्र याची पुर्तता होऊ शकली नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात,तालुक्यात,गावात 10 ते 12 तास लोडशेडिंग होतं आहे. त्यात महावितरणने आता उद्योजकांना संजीवनी दिली आहे.

close