दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपपत्र तयार

December 31, 2012 12:44 PM0 commentsViews: 6

31 डिसेंबर

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र तयार केलंय. याप्रकरणी दिल्ली पोलीस 30 हून अधिक जणांची साक्ष नोंदवणार आहेत. त्यात डॉक्टर, पोलीस आणि उच्चायुक्तालयातल्या अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. कायदेतज्ज्ञ या आरोपपत्राची तपासणी करत आहे. हे प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं पोलिसांचं मत आहे. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पोलीस कोर्टात करणार आहेत.

दरम्यान दिल्लीत जंतरमंतरवर तरूणाईचे आंदोलन सुरूच आहे. कठोर कायद्याच्या मागणीसाठी दोघांनी जंतरमंतरवर सुरू केलेलं उपोषण अजूनही सुरूच आहे. तसंच गेल्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली सर्व मेट्रो स्टेशन्स पुन्हा खुली करण्यात आली आहेत. तर इंडिया गेटच्या बाहेरचा भागही खुला करण्यात आलाय. वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र नवी दिल्लीत अजूनही 144 कलम कायम ठेवण्यात आलंय. फक्त रामलीला आणि जंतर मंतरवरच निदर्शनं करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

close